Monday 11 July 2011

धुंद होते ...

धुंद होते शब्द सारे  
धुंद होत्या भावना
धुंद होते शब्द सारे  
धुंद होत्या भावना
वार्या संगे वाहत्या त्या फुलापाशी थांबना 
धुंद होते शब्द सारे  
धुंद होत्या भावना
धुंद होते शब्द सारे  
धुंद होत्या भावना
वार्या संगे वाहत्या त्या फुलापाशी थांबना 
सैये...रमुनी  सार्या या जगात रिक्त भाव असे परी
कैसे गुंफू गीत हे
धुंद होते शब्द सारे
मेघ दाटुनी गंध लहरूनी बरसला मल्हार हा
मेघ दाटुनी गंध लहरूनी बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा
का कळेना काय झाले भास कि आभास सारे
जीवनाचा गंध हा विश्रांत हा शांत हा
धुंद होते शब्द सारे
धुंद होते  भाव सारे
सैये...रमुनी  सार्या या जगात रिक्त भाव असे परी
कैसे गुंफू गीत हे
धुंद होते शब्द सारे
धुंद होते शब्द सारे  
धुंद होत्या भावना
वार्या संगे वाहत्या त्या फुलापाशी थांबना 
धुंद होते शब्द सारे

- कौस्तुभ सावरकर

No comments:

Post a Comment