Wednesday 20 July 2011

एक झाड

एक झाड कमरेमध्ये वाकलेल
पक्षी मोजता-मोजता हिशोब चुकलेल
मुळात चुकल काय
चुकल कायचुकल काय
मुळात चुकल कायपाह्यला झुकलेल

एक मासा पाण्यामुळे पिडलेला
स्वत: मध्ये खोल खोल बुडलेला
रडता येत नाही
येत नाही..येत नाही
रडता येत नाहीम्हणून चिडलेला

एक आभाळ उंच उंच टांगलेल
खाली बघून खोल खोल भ्यालेल
ढगात खूपसून मान
खूपसून मानखूपसून मान
ढगात खूपसून मान धपकून बसलेल

एक शून्य काना कोपरा नसलेल
बेरीज वजा गुणत भागत बसलेल
वेड्या सारख
वेड्या सारख...वेड्या सारख
शून्यात बघत हसलेल

एक मी सार सार बघणारा
दिसतो जिथे कधीच तिथे नसणारा
माझ्यात सारेमाझ्यात सारे
माझ्यात सारेमाझ्यात सारे
माझ्यात सारेसार्यात माझे पाहणारा

एक झाड कमरे मध्ये वाकलेल
एक मासा पाण्यामुळे पिडलेला
एक आभाळ उंच उंच टांगलेल
एक शून्य काना कोपरा नसलेल
एक मी सार सार बघणारा

- संदीप खरे

No comments:

Post a Comment