Saturday 16 July 2011

दोन हात

अरे अरे अरे मुलानो
अरे खूप झाला खेळ
अरे आता थोडे शिकायच
मोठे व्हायचमाणूस व्हायच
अरे आम्ही तुमचे खापर पणजोबा..पणजोबा..आजोबा
माणूस म्हणून जन्मलोमाणूस म्हणून फिरलोआणि माणूस म्हणूनच वारलो
कसे जगलो ऐकायचायमाणूस व्हायचय

दोन हात दोन पाय
दोन डोळे कान
छोट्या छोट्या धडावर
सावरतो मान
वार्यासवे फिरणार्या
पाठीवर पोक
सार्या जगाहून मोठे
मानेवर डोके
भांडनार जगाशी भांडनार
माणूस आम्ही ही होणार

क्षणभर सुखासाठी
जन्मभर मांडणार नाच
धरणीला आकाशाची
आता देऊ बघणार लाच
इसापाच्या बेडकिला
मारूनिया टांग
पोटभर झाले तरी
लावणार रांग
मागणार सारखी मागणार
माणूस आम्ही ही होणार

एक आला एक गेला
एक नुसता लोंबकळतो
एक कुणी एकासाठी
जन्मभर मौन पाळतो
एक कुणी एक कुणा
एकासाठी साद
एक घळी स्वत:सह
दुसर्याशी वाद
पिळनार सारखी पिळनार
माणूस आम्ही ही होणार

जन्मा आलो जगणार
वेळ आली मरणार
पोट आहे भरणार
पोटापाठी पळणार
दुसर्याला छळनार
स्वटळही छळनार
कधी नाही कळणार
कळूनिया वळणार
कधीतरी कुठेतरी
वळणाच्या पाशी
पोट येथे ठेऊनीया
जायचे उपाशी
पिसनार हा जन्म पिसनार
माणूस आम्ही ही होणार
 
 - संदीप खरे

No comments:

Post a Comment