Wednesday 29 June 2011

कधी सांजवेळी


कधी सांजवेळी मला आठवुनी
तुझ्या भोवताली जराशी वळुनी, पाहशील का ?
पाहशील का ?

तुझा दूर येथे उठू दे शहारा
शरीरावरुनी जसा गार वारा, वाहशील का ?
वाहशील का ?

रिते सूर आता इथे या उराशी
जरा सोबतीला मनाच्या तळाशी राहशील का?
राहशील का?

तुझ्या आठवांना इथे साहतो मी
तुला साहतो मी तशी तू मलाही साहशील का ?
साहशील  का?

- सौमित्र

No comments:

Post a Comment