Tuesday 21 June 2011

कशाला उद्याची बात !

दिस सारे फुलपंखी निळे 
मोरपिशी रात 
एक अनामिक स्वप्न येई
फुलून दारात 
खुणावते..अनोळखी 
परिकुणाची चाहूल 
गुढ कालच्या सावल्या 
खेळ मांडती मनात 
नको उलटूस कधी 
तुझ्या नियतीची पाने 
जिथे श्वास तुझा नवा 
तिथे नवी रुजवात 
नसे उद्याचा चेहरा 
आजच्या या आरशात 
क्षण सुखाचा हा खरा 
कशाला उद्याची बात !

- रोहिणी निनावे  

No comments:

Post a Comment