Thursday 30 June 2011

हि अवखळ देखणी

हि अवखळ देखणी माझ्या मनी साजणी 
वर सुंदर भास हा पानाफुलांच्या वरी
खळखळत्या पाण्यातून 
पाण्यातील गाण्यातून 
झुळझुळ कुणी चालते 
सळसळत्या वाऱ्यातून
वाऱ्याच्या तोरयातून
मंजुळ कुणी बोलते 
ती हसणारी,ती फुलणारी 
ती अवखळ देखणी माझ्या मनी साजणी 
वर सुंदर भास हा पानाफुलांच्या वरी

श्वासात या भास तुझा आहे सदा जागता...प्रिये गं
गंध तुझा धुंद असा दरवळतो आहे सदा 
हे अंतरंग हे तरंग झाले 
श्वास मंद हे सुगंध झाले 
गाणे तुझे गाऊनी
हे आसमंत दरवळून आले 
रंग रंग चांदण्यात न्हाले 
सारे तुला पाहुनी 
ती हसणारी,ती फुलणारी 
ती अवखळ देखणी माझ्या मनी साजणी 
वर सुंदर भास हा पानाफुलांच्या वरी

चालुनिया,थांबुनिया,शोधुनिया पहिले...तुला गं 
आज अश्या दाही दिशा सखे तुला साहिले 
सजणी ध्यास तुचं श्वास तुचं माझा 
भासतो प्रवास रोज आता चाले तुझ्यामागुनी 
सजणी पान फुल पाखरात सारा 
वाहतो तुझाच धुंद वारा वेडापिसा होवुनी 
ती हसणारी,ती फुलणारी 
ती अवखळ देखणी माझ्या मनी साजणी 
वर सुंदर भास हा पानाफुलांच्या वरी

- सौमित्र 

No comments:

Post a Comment