Tuesday 21 June 2011

पुढंच पाऊल

झिम्मा गं पोरी...झिम्मा गं पोरी
झिम्मा गं पोरी...झिम्मा
कधी डोळा येई पाणी 
कधी हसवी ही कहाणी 
सासू सुना गं वैरिणी 
कधी होतील हा मैत्रीणी ?
झिम्मा गं पोरी...झिम्मा गं पोरी
झिम्मा गं पोरी...झिम्मा
लहानाचा केला मोठा 
नाही त्याची कदर 
गेला विसरुनी सारे 
धरी तो सुनेचा पदर
जरी असे तिचा हा मुलगा 
आता माझा नवरा गं 
अजुनही फिरे आई भोवती 
कसा होऊनी भवरा गं 
तरी आनंदी बहरेल 
ह्या दोघींचे हे घरकुल 
लागे सुखाची चाहूल 
सखे गं टाक पुढंच पाऊल 

- रोहिणी निनावे

No comments:

Post a Comment