Sunday 19 June 2011

व्यर्थ


सुर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा,मी असा!

तू मला ,मी तुला पाहिले,
एकमेकांस न्याहाळिले;
दुःख माझातुझा आरसा!

एकदाही मनासारखा
तू  झालास माझा सखा;
खेळलो खेळ झाला जसा!

खूप झाले तुझे बोलणे,
खूप झाले तुझे कोपणे,
मी तरीही जसाच्या तसा!

रंग सारे तुझे झेलुनी,
शाप सारे तुझे घेउनी
हिंडतो मीच वेडापिसा!

काय मागून काही मिळे?
का तुला बात माझे कळे?
व्यर्थ हा अमृताचा वसा

- सुरेश भट

No comments:

Post a Comment