Tuesday 14 June 2011

मी एक रात्रि त्या नक्षत्रांना पुसले

मी एक रात्रि त्या नक्षत्रांना पुसले
परमेश्वर नाही घोकत मन मम बसले
परि तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी
का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले?
तो आहे किंवा नाही कुणा लागे ठाव
प्रज्ञेची पडते जिथे पांगळी धाव
गवसे किनारा, फिरे जरी दर्यात
शतशतकांमधुनी शिडे उभारून नाव!”
स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही
तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे-
त्यांनाच पुससि तू, आहे की तो नाही!”

कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment