Saturday 7 May 2011

झरे मेघ आभाळी जेव्हा

झरे मेघ आभाळी जेव्हा 
भान हरपुनी चिंब भीजावे
  थेंबांचे इवलाले मोती 
तळहातावर झेलुन घ्यावे 


झरे मेघ आभाळी जेव्हा 
मातीच्या गंधात भीनावे
         धरून बोट वाऱ्याचे अलगद 
डोंगर माथे चुंबुनी यावे 


झरे मेघ आभाळी जेव्हा 
 पाउसवेडा पक्षी ह्वावे 
क्षितिजावरल्या इंद्रधनुच्या 
  रंगामध्ये रंगुन जावे 


झरे मेघ आभाळी जेव्हा 
  हळूच हिरव्या रानी जावे 
ठायीठायीचे  हिरवे यौवन 
  गात्रामध्ये भरून घ्यावे 


आणि यातलं काहीच जमत नसेल तर...............


           झरे मेघ आभाळी जेव्हा 
क्षणभर अपुले वय विसरावे 
             नाव कागदी घेउन हाती 
खुशाल डबक्याकाठी रमावे. 

  -  गुरु ठाकूर

No comments:

Post a Comment