Tuesday 17 May 2011

नाते

तुझे असंख्यात हात त्यातलेच माझे दोन 
तुझे असंख्यात पाय त्यातलेच माझे दोन

तुझे असंख्यात डोळे त्यातलेच माझे दोन
तुझे असंख्यात ओठ त्यातलेच माझे दोन

तुझ्या संकल्पाप्रमाणे घडो त्यांची हालचाल 
तुझ्या प्रातिभ दीप्तीने माझे उजळो कपाळ 

माझ्या पिंडात स्पंदतो तुझा ब्रम्हांडाचा स्पंद 
माझ्या प्राणातून वाहे तुझा आनंद निस्पंद 

सूत्रचालका खेळतो जसा खेळविसी माते 
कळा तुझी खुलवावी असे तुझे माझे नाते.

- बा.भ.बोरकर  


No comments:

Post a Comment