Monday 16 May 2011

ऋतू जीवघेणा तुझ्या आठवांचा



अवेळीच दाटे धुके आठवांचे 
पुन्हा मोहरे झाड वेड्या मनाचे 
उरी डंख मारि हवासा हवासा;
ऋतू जीवघेणा तुझ्या आठवांचा 

दिशांतून दाटे तुझे इंद्रजाल;
तुझे रूप घेई जणू भोवताल 
पुन्हा तो शहारा फुले ओळखीचा;
ऋतू जीवघेणा तुझ्या आठवांचा

पुन्हा धाव घेई खुळा जीव मागे;
तुझ्या मिलनाची मनी आस जागे 
उगा भास होई तुझ्या पावलांचा;
ऋतू जीवघेणा तुझ्या आठवांचा.

गुरु ठाकूर

1 comment: