Sunday 15 May 2011

चाललंय काय

कुणी बी उठतंय...काही बी बोलतंय
कस भी वागतंय...चाललंय काय
अरे कमरेच काढतंय…डोक्याला बांधतंय
आणि वर हसतंय…चाललंय काय

आभाळाचं भांडं….पावसाळ्यात सुकतंय
हिवाळ्यात गळतंय…चाललंय काय
काय राव नुसतंच बघताय

आई नि बाप नाही दोघांची गाठ
पोर बघतोया वाट
भावाला भाऊ तरी पाठीला पाठ
लावी जन्माला नाट
चंद्रावानी पोर झाली डोक्याला ताप
उभ्या जन्माचा शाप आता चाललंय काय
विकलिया आई नि विकलाय बाप
पोट याला सांभाळता चाललंय काय
काय राव नुसतंच बघताय

हे राजाने काढलीया विकायला प्रजा
आता सगळीच मजा…चाललंय काय
मातीतल्या माणसाची झालीया माती
ना कुणाची भीती…चाललंय काय
आला सोन्याचा धूर…आल्या पैशाच्या गप्पा
आला बाजारात बाप्पा..चाललंय काय
देवान मारलीया कवाच टांग
तरी दर्शनाला रांग…चाललंय काय
आर..कुणी ऐकल अस काय बोलताय
खर सांगतोय…देवा शप्पथ

माणसाचं कारट…कसं लाळ गाळतंय
माग माग मागतंय…चाललंय काय
फुटतीया छाती…नि तुटलेली नाती
नि तरी सुद्धा धावतय…चाललंय काय
थांबायला वेळ नाही…बसायला वेळ नाही
बोलायला वेळ नाही…चाललंय काय
अन्नाला चव नाही…पाणी बी गोड नाही
कशाची ओढ नाही…चाललंय काय
काय राव नुसतंच बघताय

- संदीप खरे


No comments:

Post a Comment