Wednesday 18 May 2011

स्पर्श

फुलल्या लाख कळ्या
स्पर्शसुगंधा घन अंधारी फुटल्या  ग उकळ्या 

ध्वनिकंपित तनुच्या शततंत्री 
बंदी मन रतिमोहमंत्री 
लय लागुनीयां नाचु लागल्या स्वप्नींच्या पुतळ्या 

धूप जळे तिमिराचा पवनी
विनिद्रनयना व्याकुळ अवनी 
पिकुनी लवल्या नक्षांत्राच्या द्राक्षलता पिवळ्या 

भुई वाळुची संगमरवरी 
तीवर काळ्या फेनिल लहरी 
व्यथेंतुनी सुख मंथित ग्रंथित झाल्या मधुर निळ्या 

सुटल्या अवचित जटील समस्या 
फुटला रव स्मरकुटील रहस्या
जननांतरिंच्या स्मृतींच्या ज्योती पाजळल्या  सगळ्या 

द्रवली नयनें स्त्रवली हृदयें
दो चंद्राच्या संगम-उदयें
दुणी पोर्णिमा, रसा न सीमा, उसळ्यांवर उसळ्या 

- बा.भ.बोरकर   

No comments:

Post a Comment