Saturday 7 May 2011

सुटतात उखाणे सारे

वळणावरी जरासे, ती वळते आणिक हसते 
सुटतात उखाणे सारे प्रश्नांचे उत्तर मिळते 
जलतरंग ऐकु येतो 
अंतरात वाजे हलगी 
भलभलत्या उनाड शंका 
मग करू लागती सलगी
जाळ्यात गुलाबी माझे मन हळूच मग गुरफटते
  सुटतात उखाणे सारे प्रश्नांचे उत्तर मिळते 
जाणवते सूर गवसला
पण चुकतो आहे ताल
आशेच्या हिंदोळ्यावर 
होतात जिवाचे हाल 
अदमास तरी स्वप्नांचे, मन लावुनिया मोहरते
 सुटतात उखाणे सारे प्रश्नांचे उत्तर मिळते

गुरु ठाकूर

No comments:

Post a Comment