Friday 6 May 2011

इल्लू इल्लू पिल्लू


इल्लू इल्लू पिल्लू
अजून भलत टिल्लू
नाक छोटे तोरा मोठा
गाल रुसून फुल्लू

गाल गुबगुब गोरे
डोळे लुकलुक तारे
हिलवा फ्लॉक लिबिन लाल
कानी निळे झुल्लु

चिमने चिमने थिरथिर पाय
घरात राह्यला राजी न्हाय
डोळा चुकवून पळतय हल्लू
पटकन होताय गुल्लू

बडबड करणे धंदा
पक्का बोबडकांदा
हसता कुणी डोळ्यात पाणी
चॉकलेट देता खुल्लू

दमदम सारे दमती
तरी गमतीने रमती
कधी बाबाचा खांदा आणि
कधी आईचा पल्लु

संदीप खरे

No comments:

Post a Comment