Monday 12 September 2011

तू

गौरगुलाबी चर्येवर
लालकेसरी टिकली टेकलेली...

लालचुटुक ओठांत
गडद गुलाबी गुपिते मिटलेली....

लालगुलाबी वस्त्रांत
सौम्य गुलाबी कांती लपेटलेली...

मंद गुलाबी गंधाची
एक देहकुपी लवंडलेली...

सभोवताल्यांशी राखलेलं
एक फिकटं गुलाबी अंतर...

तू ?... छे! ... तू नव्हेसचं तू ;
तू तर गुलाबच्या फुलाचे भाषांतर !!!

-
संदीप खरे

No comments:

Post a Comment