विटेवरी देवा | युगे झाली फार |
सोडा पंढरपूर |
जगासाठी ||
किती यावे-जावे | तुझ्या दारापाशी |
उपाशीतापाशी |
आषाढीला ||
कितीक सांगावी ? दुष्टांची गाऱ्हाणी |
सज्जनांकारणी | कोणी
नाही ||
अमंगल सारे | पोसले जाताना |
तुझा मुकेपना | जीवघेणा
||
नाही सोसवत | आम्हा हे पाहणे |
सुकृताला जिणे |
फासासाठी ||
सत्य-असत्याचे | तुझे निरुपण |
ऐकताना शीण | आला
देवा ||
आम्हा ठावे आहे | तुझे डोळेपण |
राऊळ सोडोन | पाहा
तरी ||
वैष्णवाचा धर्म | विश्वाकार थोर |
सांगा दारोदार |
पांडुरंगा ||
...विटेवरी देवा | युगे झाली फार |
सोडा पंढरपूर |
जगासाठी ||
-- -
ना.धों.महानोर
खूपच सुंदर!!! - सुजित
ReplyDelete