Wednesday 17 August 2011

सातवा

चमच्यांच्या स्टँडवर
सात चमचे होते
एक चमचा एक दिवशी
गहाळ झाला
उरलेल्या सहांच्या गळ्यातून
प्रथमच
अनावर हुंदका फुटला
ती असती तर’ – ते उद्गारले,
तो हरवला नसता
मीही अनावरपणे
सातवा चमचा झालो
आणि त्याची रिकामी जागा घेउन
सहांच्या हुंदक्यात
सामील झालोआणि
पुटपुटलो;
खरं आहे, मित्रांनो
ती असती तर
मी हरवलो नसतो.

कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment