Monday 15 August 2011

पुण्याई

चंद्र राहिला नाही भाबड्या चकोरांचा
चांदण्यावरी ताबा आजकाल चोरांचा

लागले झाडांना दोनचार शिंतोडे
नाचही सुरू झाला जंगलात मोरांचा

मी अजूनही येथे श्वास घेतला नाही
दे सुगंध थोडासा कालच्या फुलोरांचा !

मांडले कुणी येथे आज ताट सोन्याचे ?
आठवे रामाला द्रोण रानबोरांचा!

मी तुझा क्षणासाठी हात घेतला हाती...
कायदा कसा पाळू मी तुझ्या बिलोरांचा ?

राहिली जगी माझी एवढीच पुण्याई
मी  सोयरा झालो त्या हरामखोरांचा !

- सुरेश भट

No comments:

Post a Comment