Thursday, 17 November 2011

दंश

येणारा दिवस मला हेटाळत हसणारच
जाणारा दिवस मला जाताना डसणारच

वरवरच्या बोलण्यात गेली बघ रात्र सरून
मावळता चंद्र तुझे नाव मला पुसणारच

देताना हृदय तुला केला मी हा विचार-
"
घेणारा घेणारच! देणारा फसणारच!"

हारूनही लाखवार माझी झाली हार
मी माझ्या स्वप्नांना फिरफिरून पिसणारच!

माझे घर वार्याचे अन् पायच पार्याचे
मी जगास रस्त्यावर गाताना दिसणारच!

काही भलतेच लोक तेव्हा करतील शोक
तेव्हाही मी त्यांच्या आसवांत नसणारच!

- सुरेश भट

Wednesday, 16 November 2011

हा खडक काही केल्या पाझरत नाही

हा खडक काही केल्या पाझरत नाही
मी याला पहाटे गोंजारले आहे,
संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या पश्विम रंगांची भूल देऊन पाहिली आहे,
रात्री माळरानावर नाचणार्या पौर्णिमेच्या चांदण्यांची शाल पांघरली आहे,
पण हा खडक काही केल्या पाझरत नाही.
उन्हाळ्यात हा तापतो,
थंडीमध्ये हा अगदी स्वभावगार,
पावसाळ्यात हा अगदीच इलाज नाही म्हणून
किंवा अगदीच वाईट दिसेल म्हणून
हिरव्या शेवाळ्याची किंचितशी शोभा वस्त्रे बाहेर बाहेर मिरवत बसतो
पण आत्ता हा खडक काही केल्या पाझरत नाही.
आता आता अजूनही मी या माळरानावर भटकायला येतो,
पण माझ्या सार्या गुराखी मित्रांबरोबर रहाता
मोठ्या आशेने याच्या शेजारी येऊन बसतो
की.. हा खडक कधीतरी पाझरेल तेव्हा आपण तिथे असायला हवं.
मी माझी गाणी आवरून धरली आहेत;
मी आता पावाही वाजवत नाही;
किंवा पावलांनाही आता आतूनंच नाचावसं वाटत नाही;
या सार्यांच्यापार मला या खडकाविषयी उत्सुकता वाटू लागली आहे.
खडकाला माझ्याविषयी असे काहीच वाटत नाही
हे ज्या क्षणी लक्षात आले
तेव्हापासून मी असण्यापेक्षा खडक असणेच जास्तं चांगले असे वाटू लागले आहे.
मी खडक असतो तर मलाही असं
माझ्याविषयी उत्सुकता वाटणारा,
मी आतून पाझरायला हवे असे वाटणारा
कोणीमीभेटेल ?
माझे प्रश्न, वर निळे आकाश, खाली हिरवे गवत,
त्या गवतावरती मी, माझ्या शेजारी हा खडक.
हा खडक काही केल्या पाझरत नाही.
हे सारे कित्येक दिवस चालू आहे.
आयुष्यभर पुरेल असे एखादे कोडे मिळणे
हेही असू शकते आयुष्याचे सार्थक.
मला माझ्या आयुष्याचे सार्थक मिळाले आहे;
मला माझ्या आयुष्याचे प्रश्न समजले आहेत.
उत्तर नसलेल्या प्रश्नावर नजर रोखून त्राटक करताना
आता आता जाणवत नाहीसे झाले आहे -
वारा, ऊन, थंडी, पाऊस;
भुलवत नाहीसे झाले आहे -
छंद, इच्छा, अपेक्षा, ओस;
खडक झाल्यासारखे वाटत आहे.

- संदीप खरे.

Tuesday, 15 November 2011

डोंगळ्याचं जीणं !

"तुझ्याकडे तर दिसत नाही एखादीही डिग्री..."
पारावरच्या डोंगळ्याला मी विचारले -
"...
आणि तरीही चांगला गलेलठ्ठ जगतो आहेस..."

तो थबकला
कसनुसं म्हणाला -
"
छे ! आमचं कसलं आलंय...डोंगळ्याचं जीणं !"

"
नाहीतरी काय एवढा फरक आहे ?"
मी म्हणालो...
आणि डोंगळ्यासारखा तुरूतुरू पुढे निघालो......

-
संदीप खरे

Wednesday, 9 November 2011

चौथी भिंत

खूप बोललो आता एवढंच सांग
डोळ्यांतून लागतो का मनाचा थांग ?
आठव ना पक्ष्यांचे रंगीत थवे
मी म्हटलंचंचल असतात !
तू म्हटलंस – “आपल्याला हवेत !!
मग छाती फुटून धावलोधावावंच लागतं
हातातून हात सुटून जातात, दु: त्याचं असतं
कसले गं सूर ? कसले शब्द ? सारंच थोटं
जगण्याला नसतंच धड, असलंच तर ते थोटं !
हात आहेत, पण ते हलत नाहीत
त्यांना फुलं टोचतात, काटे सलत नाहीत !
हा तुझा अणुकुचीदार का? ठेवशील का बाजूला ?
भिंत बांधली गेली एवढंच खरं, एकेक वीट उपसा कशाला ?
तीन भिंती झाल्या होत्या बांधून
तेवढ्यात तू आलीस
आणि अशी आत-बाहेर नाचते आहेस आता चिमणीसारखी
की चौथी भिंत बांधताही येत नाही……
मी ही धावायचो वार्यावर, उभा असायचो माळरानावर
मी ही पळायचो पक्ष्यांपाठीमाझ्याही घराला नव्हत्या भिंती
असो ! आता स्पष्टीकरणे नकोत जास्त
माझीच माझ्यावर चालू आहे गस्त !
चौथ्या भिंतीचे बांधकाम चालू आहे
अजून बांधून झाली नाही
आत का बाहेर ते एकदाच ठरव
नंतर आतलं बाहेर नाही आणि बाहेरचं आत नाही……
अगं भिंत असली तरी आकाश दिसतं;
आणि नीट बघीतलं तर आकाशात देव !
जगायला एवढंअगदी एवढंच लागतं

- संदिप खरे