Tuesday 18 October 2011

बाकी

होतेका ते नुसते
येणे आणिक जाणे
होत्या का त्या नुसत्या गप्पा
क्षेमकुशल अन स्मरणे ;

होते का ते नुसते फिरणे -
करड्या चढणीवरुणी
हिरवी उतरण घेणे
होते का ते नुसते बघणे
क्षितीजावरची चित्र लिपी अन
पायाखालील गवतावरची
तुसें रेशमी

निवांतवेळी
आभाळाच्या पाटीवरती
हिशोब मांडू बघता
उरते बाकी
चंद्र घेतला जरी हातचा
तरीही उरते बाकी.

इंदिरा संत

No comments:

Post a Comment