Wednesday, 9 November 2011

चौथी भिंत

खूप बोललो आता एवढंच सांग
डोळ्यांतून लागतो का मनाचा थांग ?
आठव ना पक्ष्यांचे रंगीत थवे
मी म्हटलंचंचल असतात !
तू म्हटलंस – “आपल्याला हवेत !!
मग छाती फुटून धावलोधावावंच लागतं
हातातून हात सुटून जातात, दु: त्याचं असतं
कसले गं सूर ? कसले शब्द ? सारंच थोटं
जगण्याला नसतंच धड, असलंच तर ते थोटं !
हात आहेत, पण ते हलत नाहीत
त्यांना फुलं टोचतात, काटे सलत नाहीत !
हा तुझा अणुकुचीदार का? ठेवशील का बाजूला ?
भिंत बांधली गेली एवढंच खरं, एकेक वीट उपसा कशाला ?
तीन भिंती झाल्या होत्या बांधून
तेवढ्यात तू आलीस
आणि अशी आत-बाहेर नाचते आहेस आता चिमणीसारखी
की चौथी भिंत बांधताही येत नाही……
मी ही धावायचो वार्यावर, उभा असायचो माळरानावर
मी ही पळायचो पक्ष्यांपाठीमाझ्याही घराला नव्हत्या भिंती
असो ! आता स्पष्टीकरणे नकोत जास्त
माझीच माझ्यावर चालू आहे गस्त !
चौथ्या भिंतीचे बांधकाम चालू आहे
अजून बांधून झाली नाही
आत का बाहेर ते एकदाच ठरव
नंतर आतलं बाहेर नाही आणि बाहेरचं आत नाही……
अगं भिंत असली तरी आकाश दिसतं;
आणि नीट बघीतलं तर आकाशात देव !
जगायला एवढंअगदी एवढंच लागतं

- संदिप खरे

Monday, 7 November 2011

धैर्य

जसं की...कांदा
कांद्याच्या आत वाटी...
वाटीच्या आत वाटी...
वाटीत वाटी...वाटीत वाटी...
कांदाणू...
परमकांदाणू...
आणखी आत...आत s...
अगदी ss?...
माहित नाही......

जसं की...कांदा
त्याच्यावर हवा...
त्याच्याभोवती हवा...
हवेभोवती हवा...
तिचे थरांवर थर...
मग...निर्वात...
अंधार...
अंतराळ...
अंतराळं...
बाहेर...
अगदी बाsहेर...
अगदी बाssहेरचं?
माहित नाही......

...
ती पडल्या पडल्या डोळाभर बघते मला
आणि मग डोळे मिटून हातांनीचाचपतराहते,
सध्या तिच्या असलेल्या हातांनी
सध्या माझा असलेला चेहरा......
ही कविता खरं तर भीत भीत...
कापऱ्या कापऱ्या हातांनी
तिलाच लिहायची होती एकदा...
तिचं धैर्य होत नाही...माझं होतं...एवढंच !

-
संदीप खरे