Showing posts with label श्रीरंग गोडबोले. Show all posts
Showing posts with label श्रीरंग गोडबोले. Show all posts

Wednesday, 7 November 2012

रानभूल...



मन उमजत नाही
खोल पाणी डोहात
लपलेले काही आत ज्ञात अज्ञात
ते शोधू जाता अडखडते पाऊल
या कातरवेडी पडते रानभूल...

घनदाट धुक्यातून हरवून गेली वाट
घनगर्द सभोवती जंगल हे सन्नाट
पावलो-पावली जाणवते चाहूल
या कातरवेडी पडते रानभूल...

हा एक मसीहा घुसमटत्या अंधारी
छेडीतो अनामिक भय कंपाच्या लहरी
भवताली धुरकट भग्न गुढ झाकोळ
तिमिराच्या पहरी पडते रानभूल...

- श्रीरंग गोडबोले

Monday, 18 July 2011

गुंतता हृदय हे

रात्र अंधाराती गुढ रानामध्ये दाटते हे धुके
कावरे बावरे पक्षी झाडातले जाहले हे मुके
आता चालू होई...इथे जिवघेणा...असा खेळ हा
मनाची मनाला लागत असे आस
प्रितीच्या फुलांना चादण्यांचा वास
पाखरू जिवाचे अडकत जाती
सुटका होते
गुंतता हृदय हे

-
श्रीरंग गोडबोले

Monday, 11 July 2011

कधी तु

कधी तु रिमझिम झरणारी बरसात
कधी तु चमचम करणारी चांदण्यात
कधी तु कोसळत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची ओली रात
कधी तु रिमझिम झरणारी बरसात
कधी तु चमचम करणारी चांदण्यात
कधी तु अंग अंग मोहरणारी आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात
कधी तु अंग अंग मोहरणारी आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात
कधी तु हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात
कधी तु रिमझिम झरणारी बरसात
कधी तु कोसळत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची ओली रात
कधी तु रिमझिम झरणारी बरसात
कधी तु चमचम करणारी चांदण्यात
जरी तु कळले तरी ना कळणारे दिसले तरी ना दिसणारे विरणारे मृगजळ एक क्षणात
जरी तु कळले तरी ना कळणारे दिसले तरी ना दिसणारे विरणारे मृगजळ एक क्षणात
तरी तु मिटलेल्या माझ्या पापण्यात
कधी तु रिमझिम झरणारी बरसात
कधी तु कोसळत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची ओली रात
कधी तु रिमझिम झरणारी बरसात
कधी तु चमचम करणारी चांदण्यात

- श्रीरंग गोडबोले

Tuesday, 31 May 2011

लख लख चंदेरी


लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या

तो काळ विसाव्या शतका आरंभीचा
या जगी चित्रपट बनू लागले होते
वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा
हे तंत्र आमुच्या देशी आले नव्हते
पण करुनी ठाम निर्धार योगी वृत्तीने
फाळके ऋषिंनी खडतर व्रत आचरिले
अर्जुनास जैसे लक्ष एकची डोळा
जे अशक्य होते शक्य तयांनी केले
मग कथा घेऊनी हरिश्चंद्र राजाची
या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले
शनिवार तीन मे एकोणिसशे सोळा
भारतभूमीवर चलतचित्र अवतरले
नव तेजाने मने उजळली घडली ऐसी किमया

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या

प्रभात आली प्रभात झाली जगती गाजावाजा
बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा
चित्र म्हणा वा फिल्म, सिनेमा, पिक्चर, मुव्ही काही म्हणा
आनंदाचा झोत असे हा संस्कृतीच्या पाऊल खूणा
घटकाभरची करमणूक वा दोन घडीचा विरंगूळा
बघता बघता व्यापून जातो देहभान अमुचे सगळा
रडणा-याचे अश्रू पुसतो लकेर देतो हास्याची
पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची
आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधतसे रेशिम नाते
आठवणींना असा बिलगतो कंठाशी दाटून येते
जीवाशीवाशी नाळ जोडती लावूनी जाती माया

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या

आता न आम्हा कुणी थांबवा आम्ही घेतला श्वास नवा
पाठीवरती थाप हवी मज धीर हवा आधार हवा
सात समुद्रापार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ
उच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ
रसीक जनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू
भव्य दिव्य दृक्श्राव्य कलेचे सर्वाथाने चीज करू
नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडघम अन् चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे

- श्रीरंग गोडबोले 

Sunday, 22 May 2011

अग्निहोत्र


अग्नि मिळे पुरोहितम् ।
यज्ञस्य देवाम् ऋत्वीजम् ।
होतारम् रत्नघातमम् ॥

कुठे तुझा जन्म झाला कुठे तुझे मूळ
पिढ्या पिढ्या वाहणा-या नदीचे तू जळ
पसरला वटवृक्ष निबीड नात्यांचा
एक पान घेऊ पाहे शोध अस्तित्वाचा

तळहाती घेउनिया निखारा हा रात्री
अंधाराची वाट चाले कुणी अग्निहोत्री
अग्निहोत्र, अग्निहोत्र .....

- श्रीरंग गोडबोले