Wednesday 31 August 2011

करार

चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !
सुकण्याआधी माती आणि जाण्याआधी तडे !
संपत आलाय पाऊसकाळ ! विरत चाललेत मेघ !
विजेचीही आता सतत उठ्त नाही रेघ !
मृदगंधाने आवरुन घेतलाय धुंदावण्याचा खेळ!
मोरपंखी पिसर्यांनी ही मिटण्याची वेळ !
सावाळ्या हवेत थोडं मिसळ्त चाललंय उन्ह !
खळखळणार्री नदी आता वाहते जपून जपून !
चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !
लक्षात ठेव अर्थांपेक्षा शब्दच असतात वेडे !
मनामधला कानाकोपरा चाचपून घे नीट !
लपले असतील अजुन कोठे चुकार शब्द धीट !
नजरा, आठवण, शपथा . . . सार्यांस उन्ह द्यायला हवे !
जाणयाधी ओले मन वाळायला तर हवे !
हळवी बिळवी होत पाहू नकोस माझ्याकडे
माझ्यापेक्षा लक्ष दे माझ्या बोलण्याकडे
भेटण्याआधीच निश्चित असते जेव्हा वेळ जायची !
समजुतदार मुलांसारखी खेळणी आवरून घ्यायची !
एकदम कर पाठ आणि मन कर कोरे !
भेटलो ते ही बरे झाले ! चाललो ते ही बरे !
मी ही घेतो आवरून सारे ! तू ही सावरून जा !
तळहातीच्या रेषांमधल्या वळणावरून जा !
खुदा-बिदा असलाच तर मग त्यालाच सोबत घे !
करार पूर्ण झालाअशी तेवढी दे !

- संदिप खरे

Monday 29 August 2011

आपण

आपण एखाद्यासाठी कोण असतो...
अधराचे शब्द ऐकत
"
हा आपला" असे स्वत:लाच समजावत
रात्रभर उराशी बसणारा एखादा जिवलग...?
असं म्हणत-म्हणत डोळ्यातील बाहूल्यांशी
संवाद साधू बघणारे एखादे प्रौढ़ बालक...
आपण एखाद्यासाठी कितपत असतो ?
एखाद्याच्या इछेभोवती पडलेच आपल्या नकाराचे कुंपण
तर स्मरणात राहतो का "जिवलग" शब्दाचा खोल अर्थ ?
का आपण असतो त्याच्यासाठी गोड गोड गाणारा बंदिस्त पक्षी....
जेव्हा जेव्हा चोच उघडेल तेव्हा तेव्हा मंजूळ आणि मंजूळच आवाज काढणारा ?
आपण एखाद्यासाठी कोण असू…?
पाखरांना पंख फुटतील, दिशा समजतील
आणि कळतील झाड़ सोडून जाण्याच्या आवश्यकता….
आपण असू जागा सोडू शकणारे झाड़ !!!
भरारीच्या आवेगात पक्षी फिरकलाच कधी परत
तर त्याच्या आठवणीच्या दु:खाचे चोचले पूरवणारे झाड़ !
आपण एखाद्यासाठी कोण होतो...?
भेटलो नसतो असे कोणीतरी...?
आपण एखाद्यासाठी कोण असतो...?
ज्याच्यावाचून अड़त नाही असे आगंतुक सहावे बोट...?
आपण एखाद्यासाठी कोण असू...?
कधी लहर आलीच तर अश्रू पूरवणारे एखादे कारण...?
..................................................
...................
आपण खुप करायचो अट्टाहास
पण आपण फार तर फार पाणी होऊ शकतो एखाद्यासाठी….
एखाद्याची तहान होऊ शकत नाही......

संदिप खरे

Friday 26 August 2011

फुटका पेला

शेवटी वेदमंत्रांनी अन्याय एवढा केला
मशहूर ज्ञानया झाला....गोठ्यातच जगला हेला

अडवून जरी शब्दांनी भरपूर खुशामत केली
दारात वर्तमानाच्या मी अर्थ उद्याचा नेला!

घासते घरोघर भांडी स्वप्नांची राजकुमारी
वणवणतो पोटासाठी हा राजपुत्र अलबेला

ही कुण्या राजधानीची कापती अजुन खिंडारे ?
का कुणी कलंदर येथे गुणगुणत सुळावर गेला ?

पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना
कोणीच विचारत नाही-"माणूस कोणता मेला ?

जर हवे मद्य जगण्याचे....तर हवी धुंद जन्माची
तू विसळ तुझ्या रक्ताने हृदयाचा फुटका पेला !

-  सुरेश भट